प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई : कुणाला पैसे उसने मागितले तर कधी काय होईल याचा नेम नाही. हजार रुपये मागितले याचा राग आल्याने महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. हा सगळा प्रकार अज्ञातस्थळी मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान समोर आला.
दोन दिवसापूर्वी तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीवली भूतवली येथील अज्ञात स्थळी पोलिसांना एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. कुणीतरी अनोळखी व्यक्तींने डोक्यात दगड घालून महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र ओळख पटली नसल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाणाऱ्या आणि आसपासचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
3 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट, लग्नानंतर अंजली गावी आली आणि….
तुमच्या शहरातून (मुंबई)
त्यात रिक्षा एका महिलेला त्याच दिशेने जात असल्याचे दिसून आले, रिक्षाच्या नंबरवरून चालकाला ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली दिली. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रिक्षा चालकाने चौकशीत कबुली दिली. महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी तिने आपल्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र आपल्याकडे नसल्याने दोघात वाद झाला आणि याच वादातून तिच्या डोक्यात सिमेंटचा दगड घालून तिची हत्या केल्याची कबुली दिली.
महिलेने घरीच बाळाला जन्म दिला अन् फेकलं बादलीत…, परिस्थिती ऐकून सगळेच हादरले
या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली.मात्र महिलेची ओळख अजूनही पटली नसून पुढील तपास तुर्भे पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.