रुपेशकुमार भगत (गुमला), 07 मे : झारखंड राज्यामध्ये गुमला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जामगई गावातील असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान जामगाई गावातील डोंगरावर विकृत अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह झारखंडमधील महारंग ओरावचा 23 वर्षीय मुलगा आहे. त्याच्याकडून सापडलेल्या फोटो आणि कपड्यांवरून पत्नीने ओळख पटवली आहे.
केरळला जात असल्याचे सांगून हा तरुण घरातून निघून गेला होता. त्यानंतर पुढचे काही दिवस तो कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हता. त्यानंतर तो काही दिवसांनी संपर्कहीन झाला. याबाबत पत्नीने पोलिसांना सांगितले की, 20 एप्रिलच्या रात्री मोबाईलवर बोलण्यावरून दोघांमध्ये घरात वाद झाला.
मृतदेहाचे 9 तुकडे अन् मानवी कवटी ‘त्या’ अंगणवाडी सेविकेची? पोलीस गुंतले तपासात
यानंतर तो दुसऱ्या दिवशी सकाळी केरळला जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र तेव्हापासून संपर्क होत नव्हता. सतत शोधाशोध केली जात होती मात्र तो सापडत नव्हता. नोकरीसाठी केरळला गेलेला मनूष्य कुठे गायब झाला याचा पत्ताच लागत नव्हता. परंतु 4 महिन्यांनी त्याचा मृतदेह सापडला आहे.
यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याठिकाणी मृतदेह सापडला, तिथे एका झाडाला स्कार्फ लटकलेला आढळून आला. त्यामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईच्या हुक्का पार्लरमध्ये तुफान राडा, 25 जण आले अन्… भयावह CCTV
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असे ते म्हणाले. पोलीस विविध पैलूंचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.