वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 04 मे : पुण्यातून हनीट्रॅपची एक घटना समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास सेवा अर्थात डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरूलकर हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने प्रदीप कुरूलकर यांना अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरूलकर हे हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा प्रकार उजेडात आला आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्स अधिकाऱ्यांना दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एटीएसने अटकेची कारवाई केली आहे. प्रदीप कुरूलकर यांच्या निवृत्तीला सहा महिने राहिले असताना हनीट्रॅपमध्ये फसले. गेल्या सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत ते संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.