पुणे, 19 एप्रिल : एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून महाराष्ट्रात गारपीट होत आहे. राज्यातील बहुंतांश भागात झालेल्या गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढचे दोन पुन्हा राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने दिवसा उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी वादळी पावसासह गारपीट होत असल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याचबरोबर राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे.
कधी मिळणार नवं शिकण्याची संधी? 4 वर्षांपासून शेतकऱ्यांना सतावतोय ‘तो’ प्रश्न
तुमच्या शहरातून (पुणे)
तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागच्या 10 दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी गारपीट झाल्याने रब्बी-उन्हाळी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त द्राक्ष, आंब्यासह इतरही फळपिकांना या गारपिटीचा दणका बसला आहे. याचबरोबर कांदा, टोमॅटो, कलिंगड आदी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
एप्रिलच्या सुरूवातीपासून उन्हाचा पारा वाढत असल्याने राज्यात तापमान वाढीचा उच्चांक होत आहे. मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी येथे 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची, तर अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव, अमरावती येथे तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे.
उर्वरीत राज्यात कमाल तापमान 34 ते 42 अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमान 19 ते 27 अंशांच्या दरम्यान आहे.
पुणे 38.2 (19.7), जळगाव 42.4 (23.7), कोल्हापूर 37.7 (25.0), महाबळेश्वर 31.1 (19.9), नाशिक 39.2 (20.6), निफाड 40.1 (19.0), सांगली 39.1 (23.2), सातारा 37.4 (22.5), सोलापूर 40.8 (24.9), रत्नागिरी 34.1 (26.3), छत्रपती संभाजीनगर 39.2 (24.2), नांदेड 39.8 (26.4), परभणी 41.9 (25.9), अकोला 42.8 (24.1), अमरावती 42.0 (24.7), बुलडाणा 39.0 (25.6), चंद्रपूर 43.2 (26.2), गडचिरोली 40.0 (23.4), गोंदिया 42.8 (23.2), नागपूर 40.9 (23.7), वर्धा 42.5 (27.4), वाशिम 41.4 (24.0), यवतमाळ 41.5 (24.5).
Heatwave Alert : ‘या’ शहरात सर्वात जास्त तापमान, अंगाची लाहीलाही; आतापर्यंतचे मोडले रेकॉर्ड
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.