प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 20 मे : नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट हे शिखर जगभरातील गिर्यारोहकांना कायम खुणावत असतं. सतत बदलणारे हवामान, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, उंचीवर ऑक्सिजनची कमतरता यामुळे कित्येक दिग्गजांना हे शिखर सर करणे जमलेलं नाही. एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करणे ही देखील एक मोठी उपलब्धी मानली जाते. पुण्यातील सहा वर्षांच्या चिमुरडीनं ही किमया केलीय. भातुकलीशी खेळण्याच्या वयात या मुलीनं थेट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलाय.
भातुकलीच्या वयात एव्हरेस्ट
तुमच्या शहरातून (पुणे)
आरिष्का लड्डा असं या सहा वर्षांच्या चिमुरडीचं नाव आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या आरिष्कानं तिची आई डिंपल लड्डा यांच्यासोबत एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलाय. माय-लेकीच्या जोडीनं उणे 17 अंश तापनामध्ये 130 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलंय. सहा वर्षांच्या मुलीनं केलेला हा पराक्रम पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
हा अशक्य वाटणारा विक्रम करूनही आरिष्का अगदी शांत आहे. ‘मला खूप आनंद झाला. मला हे शिखर सर करायचं होतं. तिथं खूप थंडी होती. आम्ही याक आणि इतर प्राणी पाहिले,’ असं आरिष्कानं सांगितलं. आरिष्काच्या आई डिंपल यांनीही हा वेगळा अनुभव आमच्याशी बोलताना शेअर केला.
‘मी अगदी उत्सुफुर्तपणे एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करण्याचा निर्णय घेतला. सहसा 12 वर्षांखालील मुलांना परवानगी मिळत नाही. आम्हालाही त्यावेळी मुलीला स्वत:च्या जबाबदारीवर घेऊन जा. काही त्रास झाला तर तातडीनं माघारी परतावं लागेल, अशी सूचना आम्हाला देण्यात आली होती. आम्ही आरिष्काला घेऊन पुण्याच्या आजूबाजूचे किल्ले सर केले आहेत. सिंहगड अनेकवेळा चढलोय मला तिच्या क्षमतेची जाणीव होती. त्यामुळे आम्ही एकत्र बेस कॅम्पपर्यंत जाण्याचं ठरवलं,’ असं डिंपल यांनी सांगितलं.
धनगर मटन, चुलीवरची LIVE भाकरी, पुण्यात या कधी पैलवान थाळी खायला, ठिकाण? पाहा हा VIDEO
‘आमच्या पंधरा दिवसाच्या प्रवासात आरिष्कानं पहिल्यांदाच हिमवर्षाव पाहिला. त्यामुळे ती खूप आनंदी झाली होती. आम्ही तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. सुदैवानं तिच्या तब्येतीनंही साथ दिली आणि आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं,’ असंही डिंपल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.