लखनऊ 16 एप्रिल : घरात काम करत असताना एका महिलेच्या पायाला अजगर ‘सापा’ने चावा घेतला. त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला घेऊन जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दुसरीकडे ही बाब महिलेच्या पतीला समजताच त्यानी घरी पोहोचून सापाला गोणीत भरून जिल्हा रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डात नेलं. पिशवीत साप पाहून डॉक्टर आणि नर्समध्ये एकच खळबळ उडाली. .
गोणीतील साप पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. डॉक्टरांनी साप सोबत आणण्याचे कारण विचारले असता महिलेच्या पतीने सांगितलं की, हा कोणता साप होता, हे डॉक्टरांना दाखवण्यासाठी तो साप घेऊन आला. आता त्यानुसार उपचार करा, असं तो म्हणाला.
उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर कोतवाली भागातील उमर अटवा गावात राहणारी नरेंद्रची पत्नी कुस्मा घराची साफसफाई करत होती. त्यावेळीच विषारी साप अजगराच्या पिल्लाने चावा घेतला. यानंतर महिला आरडाओरडा करून बेशुद्ध पडली. महिलेचा पती नरेंद्र याने सांगितलं की, त्याची पत्नी घरी काम करत असताना तिला साप चावला. नरेंद्रने सांगितलं की, त्याने साप पकडला कारण, साप डॉक्टरांना दाखवला तर डॉक्टर त्याप्रमाणे उपचार करतील.
जिल्हा रुग्णालयात तैनात ईएमओ डॉ. तुषार श्रीवास्तव यांनी सांगितलं की, महिलेला साप चावला होता. महिलेचा पती हा साप सोबत घेऊन रुग्णालयात आला होता. सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर, सापाला जंगलात सोडण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.