चेन्नई, 22 एप्रिल : एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. सामना संपल्यानंतरही स्टेडियममध्ये धोनी धोनी असा आवाज सुरू होता. धोनीचे चाहते सामन्यानंतर धोनी काय बोलणार हे ऐकण्यासाठी थांबून होते. धोनीने सामन्यानंतर बोलताना मी माझ्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचं सांगितलं. दरम्यान, सामन्यातील एका गोष्टीबाबत खंतही व्यक्त केली.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी फलंदाजीला उतरला नाही याची खंत त्याच्या चाहत्यांना वाटत असेल. पण धोनीला या सामन्यात एका गोष्टीची खंत वाटली आणि त्याने ती व्यक्तही केली.सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, मला कॅच ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला नाही यामुळे मी आनंदी नाहीय. मी यष्टीमागे हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमचा झेल पडकला होता.
झेल, स्टम्पिंग, धावबाद… यष्टीमागे धोनीची कमाल; IPLमध्ये स्पेशल द्विशतक
धोनी म्हणाला की, मला त्यांनी बेस्ट कॅचचा अवॉर्ड नाही दिला. आम्ही ग्लोव्हज घालतो म्हणून लोकांना वाटतं की हे काम सोपं आहे. मला वाटतं की मी घेतलेला झेल अफलातून होता. मला आजही खूप जुनी मॅच आठवते, तेव्हा राहुल द्रविड कीपिंगला होता आणि त्यानेही असाच झेल घेतला होता.
धोनीला त्याच्या वयाबद्दल आणि चपळता यावर विचारलं असता त्यानं सचिनचा उल्लेख करत म्हटलं की, तुमचं वय व्हायला लागतं तेव्हा तुम्ही अनुभवीही होता. फक्त तुम्ही सचिन तेंडुलकर नसावं, त्यांनी १६-१७ व्या वर्षी खेळायला सुरुवात केली होती. हो. माझं वय होत आहे आणि हे बोलायला मी लाजण्याचं काही कारण नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.