मुंबई, 29 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये शनिवारी 39 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने कोलकाताचा पराभव केला आहे. गुजरात टायटन्सने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धचा सामना 7 विकेट्सने जिंकला असून या विजयासह आयपीएल 2023 मधील सहावा सामना जिंकला आहे.
कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मैदानावर आलेल्या केकेआर संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. केकेआरकडून एन जगदीसनने 19, रहमानउल्ला गुरबाजने 81, व्यंकटेश अय्यरने 11, रिंकू सिंहने 19, अँद्रे रुसेलने 34 धावा केल्या. तर इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. शेवटी 20 ओव्हरमध्ये कोलकाताने 7 विकेट्स गमावून 179 धावा केल्या.
केकेआरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 179 धावा केल्या होत्या. तेव्हा विजयासाठी 180 धावांचे आव्हान मिळाले असताना गुजरात टायटन्सची सुरुवात जबरदस्त झाली. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने 49, रिद्धीमान साहाने 10, हार्दिक पांड्याने 26, विजय शंकरने 51, डेविड मिलरने 32 धावा केल्या. अखेर गुजरात टायटन्सने 18 व्या ओव्हरमध्येच केकेआरने विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण करून आयपीएल 2023 मधील 6 वा सामना जिंकला. अशा तर्हेने आयपीएल 2023 च्या पॉईंट टेबलवर गुजरात टायटन्सचा संघ प्रथम स्थानावर पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.