मुंबई, 9 एप्रिल : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी श्री हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तेथील रहिवासी मेघराज बेलेकर यांच्या घरावर फ्लेक्स बॅनर लावले होते. हे बॅनर समाजमाध्यमावर व्हायरल झाले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आले. सोबतच बॅनरवर नावे लिहून प्रसिद्धीचा प्रयत्न करणाऱ्या पाच व्यक्तिंनी जाहीर माफीनामा लिहून देत ही चूक आमच्याकडून झालेली आहे याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो असा माफीनामा जाहीर केला आहे. तर बावनकुळे यांनीही यावर माफी मागितली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
तुमच्या शहरातून (मुंबई)
सोशल मीडियावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो असलेले एक बॅनर व्हायरल होत आहे. श्री हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देणारे हे बॅनर आहे. यात बावनकुळे यांचा फोटो इतर फोटोंपेक्षा मोठा लावण्यात आला होता. सदर बॅनरचा फोटो ट्विटर पोस्ट करुन आव्हाड यांनी बावनकुळे यांना सवाल केला आहे. हा काय घाणेरडा प्रकार आहे. बावनकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात. हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
हा काय घाणेरडा प्रकार आहे
बावन्नकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात .. हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का pic.twitter.com/0iUnEyH0j6
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.