मुंबई, 15 एप्रिल : कांजुरमार्गेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहे. कांजुरमार्गमधील 15 हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या 44 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कांजुरमार्गमधील जागेबद्दल नवीन खुलासा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘हा घोटाळा खूप मोठा आहे. ज्या मुंबईचे 10 हजार कोटी वाचणार होते, कारण एक डेपो होणार होता. आरे जंगल वाचणार होतं, हे सगळं न करता, 10 हजार कोटी खर्च केले जात आहे. अनेक कंत्राट बोलावले जात आहे. लाईन 3 आणि 6 हे कांजुरमार्गला नेला आहे. 14 मेट्रोची लाईनही कल्याण-अंबरनाथला जोडणार आहे. सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यामध्ये किती हात आहे हे आम्हाला माहिती नाही. पण, हे कारशेडचे डेपो होणार आहे, त्यासाठी जमिनी कुणाच्या असणार आहे, मध्यस्थ कोण असणार आहे, कुणाच्या नावावर सातबारे आहे, कुणाचा मतदारसंघ आहे, कंत्राट कुणाला दिले जाणार आहे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केली.
(‘फडणवीस साहेब काय जादू करतील हे सांगता येत नाही’; भाजप नेत्याचं मोठं विधान)
कांजुरमार्ग कारशेड वादाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू होती ती थांबली आहे. त्यामुळे इथली जमीन कुणाची आहे, केंद्र सरकारची आहे. बिल्डरची आहे का राज्य सरकारची आहे का? मग 15 हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या 44 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आम्ही जेव्हा कांजुरमार्ग कारशेडमध्ये काम हाती घेतले तेव्हा भाजपने आक्षेप घेतला, केंद्राची मदत घेऊन अडचणीत आणलं. मग आमच्या पाठीत तेव्हा वार का केले, पाठीत खंजीर का खुपसलं, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
(अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांकडे पंचनामे करण्यासाठी पैश्याची मागणी; ‘या’ जिल्ह्यातील प्रकार)
‘आम्ही गेली अडीच तीन वर्ष मेट्रो लाईन सहा साठी कारशेड गरजेचं होतं. काम सुरू होतं, त्यामुळे कारशेड कुठे होणार असा प्रश्न उपस्थिती झाला. महाविकास आघाडी सरकार असताना कारशेडसाठी कांजुरमार्गमध्ये हलवली होती. 44 हेक्टरच्या लाईनमध्ये मेट्रो लाईन 3, 4, 6 आणि 14 यांचा कारशेड एकत्र करणार होतो. एकाच ठिकाणी कारशेड तयार करणार होतो त्यामुळे वेळ आणि जनतेचे पैसे वाचले असते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हा कारशेड झाला असता एकाच ठिकाणाहून वाहतूक करणे सोपं झालं असतं. कांजुरमार्गमध्ये एकाच ठिकाणी दुरुस्तीसाठी येऊ शकल्या असत्या. पण, भाजपने बिल्डरांच्या मदतीने हे काम बंद पाडलं. दोन वर्ष तिथे कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे मुंबईकरांना यापासून दूर ठेवले. मुंबईकरांचे पैसे उडवले, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.