मुंबई, 10 मे: आत्तापर्यंत महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांना जगातील सर्वात वेगवान विचारांची व्यक्ती मानलं जात होतं. आईन्स्टाईनचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ 160 होता. पण आता हा विक्रम अवघ्या 11 वर्षाच्या मुलीने मोडला आहे. ही मुलगी इतकी हुशार आहे कि तिनं फक्त आईन्स्टाईनच आहि तर स्टीफन हॉकिंग्सलाही मागे टाकलं आहे. नक्की कोण आहे ही जगातील सर्वात जास्त IQ असलेली मुलगी? बघूया.
आईन्स्टाईनचा बुद्ध्यांक पातळीचा विक्रम मोडणाऱ्या मुलीचं नाव अधार पेरेझ सांचेझ. तिची IQ पातळी तब्बल 162 आहे. म्हणजेच तिची आयक्यू पातळी भौतिकशास्त्रातील शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंगपेक्षा जास्त आहे. इतकंच नाही तर विक्रम केला आहे. अधार सांचेझने अवघ्या 11 वर्षांत पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
सामान्य विद्यार्थ्याला 20 वर्षांनंतरच पीजी पदवी मिळू शकते. मात्र अधारने अवघ्या 11 वर्षांतच पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. तिनं CNCI विद्यापीठातून सिस्टम्स अभियांत्रिकी आणि मेक्सिकोच्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून गणितातील औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
10वी ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मुंबईत तब्बल 5182 जागांसाठी भरतीची घोषणा
क्लेरी या फ्रेंच मासिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अधाराचं स्वप्न अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये काम करण्याचे आहे. सध्या, ती मेक्सिकोच्या स्पेस एजन्सीच्या सहकार्याने तरुण विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन आणि गणिताचा प्रचार करत आहे. विशेष म्हणजे अधार ही एका आजारानं ग्रस्त आहे तरीही तिनं हे काम करून दाखवलं आहे.
रक्त येईपर्यंत नाकात घालतात काठी, प्यायला देतात पुरुषांचं वीर्य; ‘या’ विचित्र प्रथा वाचून व्हाल शॉक
सांचेझ आहे ऑटिस्टिक
अधार पेरेझ सांचेझला ऑटिझमचा त्रास आहे. ती तीन वर्षांचा असताना हे उघड झाले. ऑटिझम हा एक विकार आहे ज्यामुळे सामाजिक संवाद आणि संवादामध्ये समस्या निर्माण होतात. ऑटिझम असलेली मुले सामान्य मुलांसारखी दिसतात पण त्यांच्या वागण्यात फरक असतो.
15 महिन्यांत तब्बल 16 दहशतवाद्यांना ठोकलं; AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात या दबंग IPS
सांचेझने अवघ्या सहाव्या वर्षी हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तिच्या आई-वडिलांना सुरुवातीला वाटले की आपली मुलगी वाईट करत आहे. म्हणूनच त्यांनी त्यांची मेडिकल कौन्सिल घेतली आणि नंतर ते सेंटर फॉर अटेन्शन टू टॅलेंट (CEDAT) या हुशार मुलांसाठी असलेल्या शाळेमध्ये केले. जिथे त्याची सुपर आयक्यू लेव्हल समोर आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.