मुंबई, 5 मे : किडनी हा शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. त्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. किडनी पूर्णपणे खराब झाल्यास माणसाचे जगणे कठीण होते. निसर्गाने आपल्याला दोन किडनी दिल्या आहेत. एक किडनी खराब झाली तर दुसरी किडनी संपूर्ण कामाचा ताबा घेते. जेव्हा आपली किडनी नीट काम करत नाही तेव्हा ती अनेक संकेत देते, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
जेवल्यानंतर शरीरात अनेक प्रकारची विषारी द्रव्ये तयार होतात. ही विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर काढण्याचे काम किडनी करते. किडनी रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करतात आणि मूत्रमार्गे उत्सर्जित करतात. किडनी निरोगी असणं खूप गरजेचं आहे. मूत्रपिंड निकामी होण्याची अनेक चिन्हे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशी लक्षणं सांगत आहोत, ज्यावरून कळते की किडनीमध्ये काही समस्या आहे.
नेहमी थकवा जाणवणे : WebMD च्या रिपोर्टनुसार, जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल तर ते किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते. जर किडनीला विष बाहेर काढण्यात समस्या येत असेल तर समजून घ्या की, हे विष तुमच्या पेशींमध्ये जमा होऊ लागले आहे. ज्यामुळे थकवा वाढू लागतो. रक्तातील टॉक्सिनचे प्रमाण वाढल्यामुळे स्नायू आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही, त्यामुळे थकवा येण्याची तक्रार नेहमी होऊ शकते. मात्र इतर अनेक आजारांमध्येही थकवा येण्याची समस्या आहे.
त्वचेवर खाज येणे : जर तुमच्या त्वचेला वारंवार खाज येत असेल तर ते मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते. जेव्हा किडनीमध्ये टॉक्सिनचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा ते त्वचेखाली दबले जाऊ लागते. ज्यामुळे त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा आणि दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते.
हात-पायांवर सूज येणे : जेव्हा आपली किडनी जास्तीचे द्रव बाहेर टाकू शकत नाही. तेव्हा हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज येण्याची समस्या उद्भवते. तुम्हालाही अचानक ही लक्षणे दिसू लागली तर तुम्हीही सावधगिरी बाळगली पाहिजे.
भूक न लागणे : जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा रक्तात घाण साचते. अशा स्थितीत मळमळ, उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भूक कमी होऊ लागते.
झोप न लागणे : किडनी फेल्युअरचा थेट संबंध खराब झोपेशी असतो. स्लीप एपनियामुळे मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या असू शकते. खरं तर शरीराच्या इतर आवश्यक अवयवांना वाचवण्यामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त अचानक दबाव वाढू शकतो ज्यामुळे किडनी निकामी होण्याची समस्या उद्भवू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.