पाटणा 15 मे : आईचे नाते हे जगातील सर्वात खास नाते मानले जाते. आईच्या श्रद्धेत इतकी ताकद असते की अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. अशा परिस्थितीत मुजफ्फरपूरमधून अशी एक खास घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका आईला 40 वर्षांपूर्वी विभक्त झालेला मुलगा परत मिळाला आहे. आपल्या मुलाला समोर पाहून आईचे डोळे पाणावले. मुलाचे अश्रूही थांबत नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फरपूरमधील वृद्ध आईचा मुलगा 40 वर्षांपूर्वी विभक्त झाला होता. बराच शोध घेऊनही त्याचा पत्ता लागला नाही. तो कधीतरी परत येईल, ही आशा घरच्या लोकांनी सोडली होती. मात्र, 70 वर्षीय आई शंपती देवी यांना आशा होती की त्यांचा मुलगा एक दिवस नक्कीच परत येईल. मुलाच्या प्रतीक्षेत चाळीस वर्षे निघून गेली, पण म्हाताऱ्या आईची नजर रस्त्यावरच खिळली होती. त्यानंतर एक चमत्कार घडला आणि 12 मे रोजी त्यांचा मुलगा अचानक घरी परतला.
आई ती आईच! तुरुंगवास झाला, नवऱ्यानं टाकलं तरी पाहा आपल्या मुलींसाठी ती काय करतेय?
वृद्ध आई शामपती देवी यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांचा मुलगा ब्रिजकिशोर 14 वर्षांचा होता, तेव्हा गावातील गुलाब नावाच्या व्यक्तीने त्याला कमाईसाठी बाहेर नेलं. परंतु तेव्हापासून तो अचानक गायब झाला. मुलाला विकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. अनेक वर्षे शोध घेऊनही मुलगा सापडला नाही, मुलापासून विभक्त झाल्यानंतर वडील लालदेव सिंह यांचा मृत्यू झाला.
त्याचवेळी तब्बल 40 वर्षांनंतर शुक्रवारी अचानक मुलगा ब्रिजकिशोर परतला. त्याची प्रकृती ठीक नाही. तो खूप अशक्त झाला आहे. त्याच्यासोबत खूप वाईट घडलं आहे, असा त्याचा आरोप आहे. त्याचं शोषण झालं. त्याने सांगितलं की, तो त्याच्या गावातील गुलाबसोबत कामासाठी बाहेरगावी गेला होता, मात्र तिथे गेल्यानंतर त्याला मजूर बनवण्यात आलं. वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये आणि दुकानात आपली पिळवणूक होत असल्याचे त्याने सांगितले. पैसे न देता कामे करून घेतली जात होती. त्याचं आयुष्य वेगवेगळ्या इस्पितळात आणि मंदिरात गेलं. पैशांअभावी तो काहीच करू शकत नव्हता. मोठ्या कष्टाने तो कसा तरी घरी पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.