मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज 23 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातचा पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सने गुजरातवर 3 विकेट्सने विजय मिळवला असून राजस्थान रॉयल्सने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने गुजरातच्या वृद्धिमान साहाची विकेट घेतली. गुजरातकडून शुभमन गिल 45 , साई सुदर्शनने 20, हार्दिक पांड्याने 28, डेविड मिलरने 46 , अभिनव मनोहरने 27 धावा केल्या. गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स घेऊन 177 धावा केलया. तर राजस्थानला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले.
गुजरातने विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले असताना, राजस्थानकडून फलंदाजीची सुरुवात खराब झाली. सुरुवातीलाच राजस्थानच्या एका मागोमाग एक विकेट पडत असताना कर्णधार संजू सॅमसनने 32 चेंडूत 60 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने 26, शिमरॉन हेटमायरने 50 तर ध्रुव जुरेलने 18 धावा केल्या. राजस्थानच्या उर्वरित फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. अखेर गुजरातच्या होम ग्राउंडवर राजस्थानचा 3 विकेट्सने विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.