मुंबई, 4 मे : आयपीएल 2023 मध्ये 47 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून केकेआरच्या 8 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. संघाचा परफॉर्मन्स पाहून सनरायजर्स हैदराबाद संघाची मालकीण खुश झाली आणि तिने स्टॅन्डमध्ये उभे राहुल जल्लोष केला.
हैदराबादचे होम ग्राउंड असलेल्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून दुसऱ्याच ओव्हरपासून केकेआरच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यास सुरुवात केली.
Marco Jansen⚡#SRHvKKR #TATAIPL #IPLonJioCinema #IPL2023 pic.twitter.com/1MCtQAKpnO
— JioCinema (@JioCinema) May 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.