मुंबई, 14 मे : सनरायजर्स हैदराबादने मोहम्मद सिराजला 2017 मध्ये भलीमोठी रक्कम मोजून संघात घेतलं होतं. सिराज तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आला नव्हता, तरी त्याच्यातलं कौशल्य, प्रतिभा ओळखून त्याला संघात घेण्यात आलं होतं. त्यानंतर एक वर्षाने आरसीबीने त्याला आपल्या संघात घेतलं. वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा सिराज 23 व्या वर्षी आरसीबीच्या संघात खेळत होता. सुरुवातीला त्याच्या गोलंदाजीला धार नव्हती पण हळू हळू बदल झाला. भारतीय संघातही त्याला संधी मिळाली. आता त्याने त्याच्या आयुष्यातील एका अशा गोष्टीबद्दल सांगितलं जिथं तो मरणाच्या दारातून परत आला.
मोहम्मद सिराजने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शोमध्ये बोलताना सांगितलं की, मला डेंग्यु झाला होता आणि प्लेटलेट्स वेगाने कमी होत होत्या. पुढच्याच दिवशी अंडर 23 संघ रवाना होणार होता. मी तणावात इकडे तिकडे फिरत होतो. माझं नाव संघात होतं पण मी रुग्णालयात होतो. मला डेंग्युची लक्षणे दिसत होती. माझ्या रक्त पेशीही कमी झाल्या होत्या. जर रुग्णालयात दाखल झालो नसतो तर माझा मृत्यूही झाला असता.
दिल्ली आऊट, पंबाजच्या विजयाने RR आणि PBKSला फटका; प्लेऑफची चुरस वाढली
सिराज म्हणाला की,”मी माझ्या अवस्थेबद्दल प्रशिक्षकांनाही सांगितलं. मी संघात नवा असल्यानं माझ्यावर काहींनी विश्वासही ठेवला नाही. मी खोटं बोलतोय असं वाटलं असणार. कारण खोट बोलून प्रॅक्टिस टाळायचो.” सध्या आरसीबीच्या संघात असलेला मोहम्मद सिराज यंदाच्या हंगामात फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने 11 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो टॉपला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.