मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबीच्या होम ग्राउंडवर तुफान फटकेबाजी करत अर्धशतकीय खेळी करून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध केलेल्या धावांमुळे विराटने टी 20 क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूला मागे टाकलं आहे.
बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला आहे. आयपीएल 2023 मध्ये आरसीबीचा संघ दुसरा सामना आपल्या होम ग्राउंडवर खेळत असून या सामन्यात सुरुवातीला लखनऊ संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने सुरुवातीपासूनच मैदानात तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.
has a box to tick when he comes out to bat against #LSG tonight ✅
Predict Virat Kohli’s score & enjoy #RCBvLSG with #IPLonJioCinema – absolutely LIVE & FREE across all telecom operators!#ViratKohli #TATAIPL #IPL2023 | @imVkohli pic.twitter.com/Z5u7f9vvdy
— JioCinema (@JioCinema) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.