मुंबई, 14 मे : आयपीएल 2023 मध्ये 60 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात पारपडला. या सामन्यात आरसीबीकडून राजस्थानचा लाजिरवाणा पराभव झाला. आरसीबीने राजस्थान रॉयल्सला 59 धावात गुंडाळून 112 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्सचे होम ग्राउंड असलेल्या जयपूर स्टेडियमवर राजस्थान विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात प्रथम आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या आरसीबी संघाकडून विराट कोहलीने 18, फाफ डू प्लेसिसने 55, ग्लेन मॅक्सवेलने 54, अनुज रावतने 29 धावांची कामगिरी केली. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 171 धावा करत 5 विकेट्स गमावल्या आणि राजस्थानला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले.
विजयाचे आव्हान पूर्ण करत असताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर , आर अश्विन यासारखे 5 फलंदाज शुन्य धावांवर बाद झाले. तर केवळ जो रूटने 10, हॅटमेयरने 35 धावा केल्या तर इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. त्यामुळे अखेर आरसीबीच्या भेदक गोलंदाजी समोर राजस्थानचा संघ 59 धावांवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी दारुण पराभव झाल्यामुळे आत त्यांच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. राजस्थान विरुद्ध विजय मिळवून आरसीबीचा संघ पॉईंट टेबलमध्ये पाचव्या तर राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.