मुंबई, 9 एप्रिल : आयपीएलच्या 16 व्या सिजनला सुरुवात झाली असून यात खेळाडू दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहेत. आज रविवारी 9 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरातचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल याने एक मोठा विक्रम नावावर केला असून यासह त्याने एम एस धोनीला देखील मागे सोडले आहे.
आयपीएल चा 13 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातने सलग 2 सामने जिंकले असून आज केकेआर विरुद्धचा सामना जिंकून तिसरा विजय संपादन करण्यासाठी गुजरातचे खेळाडू सज्ज आहेत. तर कोलकाताचा संघ देखील आरसीबीनंतर गुजरातला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच गुजरातचा युवा फलंदाज शुभमन गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत मोठा माईलस्टोन हिट केला आहे.
! @ShubmanGill completes 2,000 #TATAIPL runs!
, ! #GT – 62/1 (7 overs)#AavaDe | #TATAIPL 2023 | #GTvKKR pic.twitter.com/ldIawVTKRv
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.