सन २०२२ – २३ चा जिल्ह्याचा प्रारुप आराखडा शासनास सादर करावयाचा असल्याने जिल्हा नियोजन समितीची विशेष सभा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. ब्रम्हपुरी येथील उपविभागीय कार्यालयातून पालकमंत्र्यांनी बैठकीला संबोधित केले. शासनाने २०२२ – २३ करीता जिल्ह्याचा नियतव्यय आराखडा २१५ कोटींचा करण्यास मान्यता दिली आहे. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत ८५ कोटी तर अनुसूचित जाती योजनेंतर्गत ७२ कोटींचा प्रारुप आराखडा आहे. सन २०२२ – २३ करीता निर्धारीत करण्यात आलेला सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना प्रारुप आराखड्यात २५ ते ३० टक्क्यांची वाढ करण्याचा ठराव पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला.
बैठकीला व्हीसीद्वारे जि.प. अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.