लखनऊ 20 मे : ‘साथ जिएंगे, साथ मरेंगे’ ही प्रेमी जोडप्यांसाठीची म्हण प्रत्येकाने ऐकली असेल. पण प्रत्यक्षात उत्तर प्रदेशातील बांदा येथेही असाच प्रकार समोर आला आहे. येथे प्रेमी युगुलाचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून दोघांनी विष प्राशन केलं. यात विष प्राशन केल्याने प्रेयसीचा मृत्यू झाला. त्याचवेळी प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रेमकथेचा शेवट अतिशय वेदनादायी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकूट जिल्ह्यातील भरतकुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारा तरुण बांदा येथील बडौसा पोलीस स्टेशन परिसरात रेल्वे विभागात गेटमन आहे. गेटमन विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत. त्याचे जवळच्याच एका तरुणीसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत निश्चित केलं होतं
हनिमूनच्या नावाखाली सासूकडून 5 लाख घेतले अन् पत्नीला हातही लावला नाही, आता आला अडचणीत
मुलीने लग्नाला नकार दिला. तिला तिच्या विवाहित प्रियकराशीच लग्न करायचं होतं. मात्र घरातील सदस्यांच्या विरोधासमोर ती हारली. 31 मे रोजी तरुणीचा विवाह होणार होता. मुलीच्या विवाहित प्रियकराला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा दोघांनीही ठरवलं की आपण जिवंत राहिलो तरी एकमेकांचे होऊ शकणार नाही. त्यामुळे दोघांनी आत्महत्येचा विचार केला.
दोघांनी गुरुवारी सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन केलं. त्यांची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी दोघांनाही रुग्णालयात नेलं. उपचारादरम्यान प्रेयसीचा मृत्यू झाला. त्याचबरोबर प्रियकराची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी प्रेयसीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपासही सुरू झाला आहे. प्रियकर शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत. त्याचा जबाब घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.