प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 16 मे : स्वप्न तर सगळेच पाहतात पण जगावेगळे स्वप्न पाहणारे फार कमी आणि ते प्रत्यक्षात साकार करणारे तर त्याहून कमी असतात. असे लोक सर्व तात्कालिक संकल्पना मोडून कल्पनांना छेद देऊन आपल्या भव्यदिव्य कर्तृत्वाचे असे दर्शन घडवतात की सगळे जग थक्क होऊन पाहतच राहते. असेच असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातील जागतिक ख्यातीच्या स्कायडायव्हर शीतल महाजन आहेत. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवरून पॅराशूट जंप करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
कशी झाली स्कायडायव्हिंगची सुरुवात?
तुमच्या शहरातून (पुणे)
शीतल महाजन या बहिणाबाई चौधरी यांच्या पणती आहेत. त्यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतलेल्या शीतल यांच्या आयुष्यात 2003 साली स्कायडायव्हिंग आले आणि पुढे तेच त्यांचे आयुष्य झाले. त्या स्कायडायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी भारताबाहेर गेल्या आणि या आवडीच्या खेळात स्वत:ला झोकून दिले. साहस आणि आव्हान स्वीकारणं हा जणू त्यांचा श्वासच आहे. आणि आभाळसुद्धा ठेंगणे व्हावे असा त्यांचा आभाळातील कर्तृत्वप्रवास सुरू झाला.
इतिहास घडवला
18 एप्रिल 2004 रोजी त्यांनी इतिहास घडवला. उत्तर ध्रुवावर 2400 फुटांवरून जिथे कुठलीही जमीन नसताना शुद्रावर तरंगणाऱ्या बर्फ़ाच्या एका तुकड्यावर उणे 37 डिग्री सेल्सिअस तापमानात त्यांनी आयुष्यातील पहिली उडी कोणत्याही सरावाशिवाय घेतली. असे करणाऱ्या त्या जगातील पहिल्या सर्वात कमी वयाच्या भारतीय महिला ठरल्या. 16 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण ध्रुवावरून एक्सलरेटेड फ्री कॉल अशा पद्धतीची दुसरी उडी त्यांनी घेतली.
कुठल्याही सरावाशिवाय दोन्ही ध्रुवांवरून पॅराशूट जंप करणाऱ्या शीतल महाजन ह्या जगातील पहिल्या भारतीय महिला आहेत. त्याचबरोबर त्यांनी पृथ्वीच्या सात खंडांवरून पॅराशूट जंप करून आणखी एक विश्वविक्रम केलेला आहे. 2011 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांनी नऊवारी साडी नेसून आकाशातून उडी घेतली होती.
Nagpur News: केरळचा शिवभक्त तरुण, तब्बल 194 किल्ले केले सर, हमरासबद्दल वाचून वाटेल अभिमान, Video
स्पेशल जंप कोणता?
मी आत्ता पर्यंत 727 जंप केल्या आहेत. त्यातील माझी स्पेशल जंप अशी की जेव्हा मी माझ्या दोन जुळ्या 10 वर्षांच्या मुलांसोबत त्यांच्या वाढदिवसादिवशी जंप मारली आणि स्कायडायव्हिंग केली ती माझी सर्वात खास जंप होती. त्याचबरोबर जेव्हा मी पहिल्याच वेळी साडी नेसून जंप करायचे ठरवले आणि ती जंप प्रत्यक्षात करून दाखवली ही एक गोष्ट माझ्यासाठी स्पेशल होती, असं शीतल महाजन यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.