धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 20 मे : दर रविवारी घराबाहेर पडताना मुंबईकरांना मेगा ब्लॉकचं टेन्शन असतं. उपनगरीय रेल्वेच्या कामांसाठी दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे अनेक गाड्या रद्द होतात. तसंच त्यांच्या मार्गातही बदल होतो. उद्या (21 मे)रोजी देखील वेगवेगळ्या अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मुंबई उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रविवारी लोकलच वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक
तुमच्या शहरातून (मुंबई)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कोकणवासियांसाठी खुशखबर! 29 मे पासून धावणार वंदे भारत एक्स्प्रेस
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
गोरेगाव जोगेश्वरी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मध्यरात्री 12 ते दुपारी 2 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. कामानिमित्त हा ब्लॉक 14 तासांचा घेण्यात आला आहे. त्यामुळे या दरम्यान लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या आणि लोकल 15 मिनिटं उशिराने धावणार आहेत.
Mumbai Weather Update : उन्हापासून आज होणार की नाही सुटका? पाहा आज मुंबईत किती असेल तापमान
हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक
डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून) पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.