मुंबई, 12 मार्च : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असून ते भाजपमध्ये सामील होणार अशी बातमी व्हायरल झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी सुद्धा अजितदादा 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला. यावर अजितदादांनी मी छोटा माणूस आहे, काय बोलणार असं म्हणून खिल्ली उडवली आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्र शिखर बँक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
अंजली दमानिया यांनी अजित पवार हे 15 आमदारांसह भाजपला पाठिंबा देतील, असं ट्वीट केलं होतं. याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार’ असं म्हणताच एकच हश्शा पिकली.
पुण्यात भाजप उमेदवारांनी तक्रार केली आहे. मुळात कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुणाचाही जीवाला धोका असेल तर संरक्षण द्यावे, पोलिसांनी संरक्षण द्यावे माझ्यामुळे धोका होईल असं वाटत का? मी कायदा पळणारा नेता आहे. राजकीय धोका असू शकतो शारीरिक धोका असू शकत नाही, असंही अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
(अण्णा हजारेंची 1 मे रोजी हत्या करणार, कुटुंबावर अन्याय झाल्याने तरुणाचा इशारा)
त्या बातमीत तथ्य नाही. क्लीन चिट मिळाली नाही. स्पष्टपणे सांगतो कशाच्या आधारावर बातमी आली माहित नाही. पण अजून त्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहे. नियुक्त्यांबाबत आणि अवकाळी पाऊस बाबत भेट होणार आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, एक लाख एकर पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अजून अवकाळी पाऊस गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अजून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री दौरे झाले आहे. आमदारांनी सांगितले किती नुकसान झाले आहे. विचार करून मी पत्र दिले आहे. आज बैठक झाली तेव्हा विषय काढीन, असंही अजित पवार म्हणाले.
(पुण्यात माझ्यामुळे जीवाला धोका असलेल्याला संरक्षण द्या – अजित पवार )
‘मार्केट समितीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशी विधान का करतात? कारण नसताना आघाडीत अंतर पडू शकते. या गोष्टी त्यांनी आमच्याशी बोलावे, उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे. कुठे काय झालं. टाळी एक हाताने वाजत नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात येतात, असं म्हणत अजित पवारांनी नाना पटोलेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.
‘मला पवार साहेब बोलले होते भेट होणार आहे. बरेच दिवस भेट झाली नव्हती म्हणून भेट झालो. मध्ये वेगवेगळी विधानं झाली. त्यावर चर्चा झाली असावी. 1 मे मुंबईत बीकेसी सभा आहे त्यावर चर्चा झाली, असंही अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.