चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 16 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 15 दिवसानंतर महाराष्ट्रच्या राजकारण मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त प्रकाश आंबेडकर पुण्यात आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
तुमच्या शहरातून (पुणे)
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
राज्यात सुरू असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले, की “15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारण मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि हा एक नसून 2 बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकार आंबेडकर यांनी केला आहे. शिवसेने बरोबर वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. आमच्या युतीची काळजी करू नका, असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.
पुलवामा बाबत त्यावेळी ही मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. त्याला प्रोटेक्शन नव्हतं. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होतं. दहा गाड्या कॅनॉव्ह बद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे, ती बाब यांना माहिती नसावी. यांची साधी चौकशी सुद्धा नाही. पॉलिटिकल राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांपासून वीर सावरकरांपर्यंत; अमित शहांनी सांगितल्या महाराष्ट्राच्या 3 परंपरा
आमदार अपात्र झाले तरी सरकार स्थिर, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकार स्थिर राहील असा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी 16 आमदार अपात्र जरी झाले तरी सत्ताधारी पक्षाकडे कसं बहुमत राहिल याचं गणितच मांडलं आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, अपक्ष धरून भाजपकडे 115 आमदार आहेत. 106 त्यांचे आणि नऊ अपक्ष. एकनाथ शिंदेसोबत गेलेले 40 आमदार, 10 अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून 155 आणि 10 अपक्ष असे 165 आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकाड कायम राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.