भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 3 मे: नेहमीच्या घरगुती पदार्थांपेक्षा काहीतरी हटके खाण्याकडे अनेकांचा कल असतो. उदरभरण करताना जिभेचे लाडही पुरवले जातात. अशावेळी हटके पर्याय देण्याचे काम ठाण्यातील उल्हासनगरच्या बिट्टू डोसावाला यांनी केले आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल 150 डोशांचे प्रकार आणि मेदूवडा सँडविच तयार करणाऱ्या बिट्टुकडे खवय्ये गर्दी करत आहेत.
ठाण्यात मिळतो सँडविच मेदूवडा
तुमच्या शहरातून (मुंबई)
कधी कोणाला मेदूवडा सांबारात भिजवून खायला आवडतो. तर कधी कोणाला मेदूवडा चटणी खायला आवडते. मात्र सँडविच मेदूवडा हा प्रकार कधी तुम्ही ऐकला आहे का? सँडविच मेदूवडा हा प्रकार एकदम भन्नाट आहे. गरमा गरम तेलात उडी मारून बाहेर आलेला सोनेरी रंगाचा मेदुवदा मध्येच कापून त्यामध्ये चायनीज चटणी, मेयोनिज आणि चायनीज न्युडल्स भरून दिलेले हे मेदूवडा सँडविच अफलातून लागते.
रोज 500 मेदूवड्यांची विक्री
केवळ संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मिळणारे हे वडा सँडविच खाण्यासाठी खवय्ये उल्हासनगर येथे हमखास जातात. 30 रुपयाला दोन असे हे वडा सँडविच उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खाण्याची आवड असलेल्या बिट्टूचे हे दुकान खूप जुने असून सुरुवातीला त्याची आई येथे डोसे बनवत होती. त्यावेळी बिट्टू आईला मदत करत. मदत करता करता डोसे बनवायला शिकणाऱ्या बिट्टूला याच चवीचे डोसे खाण्यापेक्षा विविध चवीचे डोसे आपण बनवायला हवे असे जाणवले. यावेळी त्याला काही अनोखे कॉम्बिनेशन करून बघावे अशी कल्पना सुचली आणि चायनीज मेदू वडा बनवून बघितला. सध्या बिट्टू दिवसाला 500 मेदूवडा विकत असल्याचे त्याने सांगितले.
तुम्ही कधी पाहिला नसेल एवढा मोठा डोसा, खाण्यासाठी लागतात 4 माणसं, PHOTOS
डोशाचे विविध प्रकार
साधा डोसा, मैसूर डोसा असे डोशांचे अनेक प्रकार आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र तुम्ही अंगार डोसा, पावभाजी डोसा, चिली चीज डोसा, असे प्रकार कधी ऐकले आहेत का? मात्र मेदुवडा सँडविच व्यतिरिक्त बिट्टू कडे डोशाचे प्रकार उपलब्ध आहेत. हे डोसे बनवताना प्रत्येक डोशात वेगळे मसाले वापरतो. इतकेच नव्हे तर कोबी, कांदा, बटर, मेयोनिज, चीज, पनीर, कोथिंबीर, विविध मसाले यांचा तो वापर करतो. जवळपास रोज त्याला 50 किलो डोशाचे पीठ लागत असल्याचे तो सांगतो. त्यामुळे बिट्टू कडे आल्यानंतर तुम्ही तृप्त व्हाल यात शंका नाही.
कुठे मिळेल डोसा – बिट्टू डोसा कॉर्नर, कुर्ला कॅम्प सर्कल, उल्हासनगर – 5
कधी – सायंकाळी 7 ते रात्री 10.30 पर्यंत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.