मुंबई, 10 मे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरूवारी लागणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार? यावर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांना अपात्र का करू नये? असं नव्हतं तर त्या 16 आमदारांना अपात्र केलं होतं, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.
‘मी सर्व बाजूंनी अभ्यास करून निर्णय घेतला. घटनेचा, सभागृहाचा, पक्षाच्या गटाचा, कोणाचे अधिकार कुणाला आहेत? याबाबत अभ्यास करूनच 16 आमदारांना अपात्र केलं होतं’, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत. कोर्ट 16 लोकांना अपात्र केलं आहे, ते योग्य आहे असाच निर्णय देऊ शकतं, असं झिरवळ यांना वाटत आहे.
ठाकरे जिंकणार की शिंदे? या मुद्यांवर निकाल आला तर राज्याचं चित्र बदलणार?
सुप्रीम कोर्टाने परत हा मुद्दा विधिमंडळाकडे पाठवला तर तत्कालिन अध्यक्ष म्हणून ते माझ्याकडेच येईल, असा विश्वास झिरवळ यांनी व्यक्त केला. माझ्यावरचा अविश्वास रितसर नव्हताच, तर त्यावर कारवाई काय होईल? रितसर असता तर तो मांडावा लागतो, त्याचं संख्याबळ दाखवावं लागतं. योग्य पद्धतीने त्याची मांडणीच झाली नव्हती, त्यामुळे अविश्वास यायचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली.
‘मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्रक्रिया सुरू होताना नार्वेकर साहेब सभागृहात नव्हते, मी निर्णय दिला त्यावेळी नार्वेकर साहेब नव्हते. अजूनही मी त्या जागेवर आहे, त्यामुळे निर्णय माझ्याकडेच येईल. जो निर्णय दिलाय तो मी दिलाय, त्यामुळे माझ्याकडेच निर्णय येईल,’ असं विधान नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदेंसह हे आहेत 16 MLA, आमदारकीसह मंत्रिपदही धोक्यात, संपूर्ण यादी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.