हैदराबाद, 21 मे : तेलंगणातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. आसिफाबाद जिल्ह्यातील एका शालेय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या विद्यार्थ्याचे वय अवघे 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. 19 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर किशोरला घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वाढदिवशी मुलाचा दुर्दैवी मृत्यू
या घटनेतील सर्वात दुःखद क्षण म्हणजे मृत्यूच्या दिवशीच त्याच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. पण अचानक आलेल्या या भयंकर संकटाने सर्वांच्या आनंदावर विरझण घातले. त्या मुलाच्या मृत्यूनंतरही मुलाच्या पालकांनी प्रतिकात्मक पद्धतीने वाढदिवस साजरा करून केक कापला. यावेळी श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पार्थिवावर केकचा छोटा तुकडाही ठेवण्यात आला होता.
वाचा – भाजप नेत्याच्या मुलीचा मुस्लिम तरुणाशी ठरवलेला विवाह रद्द! पत्रिका झाली होती व्हायरल
सीएच सचिन हा दहावीचा विद्यार्थी होता
सीएच सचिन (16) हा दहावीचा विद्यार्थी होता. 18 मे रोजी तो त्याच्या काही मित्रांसह आसिफाबाद शहरात आपल्या वाढदिवसाच्या तयारीसाठी खरेदीसाठी गेला होता. खरेदी करत असताना अचानक त्याला छातीत दुखू लागले. वेदना इतकी तीव्र होती की त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं, तो जमिनीवर पडला.
सचिनची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून लोकांनी घाईघाईने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. येथे प्रकृती न सुधारल्याने त्याला मंचेरियल येथील दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे गेल्या शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.