मुंबई, 21 एप्रिल- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी म्हणजे श्वेता तिवारी होय. श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावर आपला दबदबा निर्माण केला आहे.आजही श्वेता छोट्या पडद्यावर तितकीच लोकप्रिय आणि सक्रिय आहे. श्वेता तिवारीचं व्यावसायिक आयुष्य फारच यशस्वी आहे.परंतु श्वेताचं खाजगी आयुष्य मात्र फारच कठीण राहिलं आहे. अभिनेत्री नेहमीच आपल्या खाजगी गोष्टींमुळे चर्चेत राहिली आहे. श्वेताचं वैवाहिक आयुष्य फारच कठीण होतं. अभिनेत्रीने दोन लग्ने केली आहेत.मात्र तिची दोन्ही लग्न अयशस्वी ठरली आहेत.सध्या श्वेता एक सिंगल मदर म्हणून आपलं आयुष्य जगत आहे.अनेकांना प्रश्न पडतो की श्वेता तिवारीचा पहिला पती कोण आहे?आणि अभिनेत्रीचा घटस्फोट का झाला? तर आपण आज याबाबतच जाणून घेऊया.
श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. श्वेताने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.आजही अभिनेत्रीला या मालिकेसाठी ओळखलं जातं. श्वेताने अनेक मालिकांमध्ये दमदार अभिनय करत इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनय क्षेत्राशी निगडित कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना श्वेताने केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे. वयाच्या चाळीशीत श्वेता आजही तितकीच सुंदर आणि फिट आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारी आता बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे.श्वेताला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आणि दुसऱ्या लग्नातून एक मुलगा अशी अपत्ये आहेत.
कोण आहे श्वेता तिवरीचा पहिला पती?-
श्वेता तिवारीचा पहिला पती इतर कुणी नसून बिग बॉस फेम राजा चौधरी आहे.राजाने बिग बॉसमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. श्वेता आणि राजाने फारच कमी वयात एकमेकांशी लव्हमॅरेज केलं होतं. लग्नावेळी श्वेता अवघ्या 19 वर्षांची होती.फारच कमी वयात श्वेताने राजासोबत संसार थाटला होता.राजा आणि श्वेता त्याकाळात टीव्हीवरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक होते.सुरुवातीच्या काळात दोघांचं नातं फारच छान सुरु होतं.पण काही वर्षांनंतर दोघांमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. हा वाद इतका वाढत गेला की अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
या दोघांचं नातं इतकं बिघडलं होतं की, श्वेता तिवारीने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.अभिनेत्री खुलासा करत म्हटलं होतं की, राजा सतत दारु पिऊन आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ करतो. इतकंच नव्हे तर तो आपली मुलगी पलकवरसुध्दा हात उगारत असल्याचा खळबळजनक दावा श्वेताने केला होता. त्यांनंतर श्वेताने राजापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.परंतु हे तितकं सोपं नव्हतं. श्वेताला घटस्फोट घेण्यासाठी अनेक दिवस कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या.
घटस्फोट देण्यासाठी राजाने श्वेतासमोर ठेवलेली अट-
श्वेता तिवारीच्या मते,राजाने घटस्फोट देण्यासाठी तिच्यासमोर मोठी अट ठेवली होती.जी ऐकून श्वेता चकित झाली होती.मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजाने घटस्फोट देण्यासाठी आणि मुलगी पलकची कस्टडी देण्यासाठी श्वेताजवळ संपत्तीत वाटणी देण्याची अट ठेवली होती.या दोघांनी लग्नानंतर कॉमनमध्ये मुंबईत एक 90 लाखांचा फ्लॅट खरेदी केला होता. श्वेताने घटस्फोट घेण्यासाठी त्या फ्लॅटची मालकी राजाला दिली होती.
दरम्यान मुलगी पलकची कस्टडी श्वेताला देण्यात आली होती. कोर्टाने निकालात राजाला पलकला कधीही न भेटण्याचा निर्णय दिला होता.तर या निकालात पलक मात्र आपल्या वडिलांना इच्छा असेल तेव्हा भेटू शकते असं सांगण्यात आलं होतं. अनेक वर्ष लाईमलाईटपासून दूर राहिल्यानंतर राजा गेल्यावर्षी अचानक चर्चेत आला होता. मीडिया रिपोर्ट्सनीसार राजाने आपण पुन्हा मुंबईत शिफ्ट झाल्याचं उघड केलं होतं.मुलगी पलकला भेटता यावं आणि तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी राजाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.