भुबनेश्वर 15 एप्रिल : जगात लग्नाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. काहींनी स्वतःशी लग्न केलं तर काहींनी बाहुल्यांचं लग्न केलं. पण भारतातील ओडिशातून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. इथे एका मुलाचं मादी कुत्रीसोबत तर मुलीचं लग्न कुत्र्यासोबत लावून देण्यात आलं. माणूस आणि कुत्रा यांचं लग्न, ऐकायला विचित्र वाटेल पण हे सत्य आहे.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका आदिवासी गावात अंधश्रद्धेच्या आधारे दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी असे दोन विवाह झाले. मचुआ सिंग यांना त्यांचा 11 वर्षांचा मुलगा तपन सिंगसाठी वधू म्हणून एका मादी कुत्र्याची व्यवस्था करावी लागली. तर मानस सिंग यांनी त्यांची ७ वर्षांची मुलगी लक्ष्मीचं लग्न एका कुत्र्याशी लावलं. माचुआ आणि मानस हे सोरो ब्लॉकमधील बंधशाही गावातील हो जमातीचे सदस्य आहेत.
मुलांचा पहिला दात येताच त्यांनी मुलांच्या लग्नासाठी कुत्र्याचा शोध सुरू केला. असं न केल्यास आपल्या मुलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असा या आदिवासींचा विश्वास आहे. 28 वर्षीय सागर सिंह यांनी सांगितलं की, समाजाच्या परंपरेनुसार हे दोन्ही विवाह सकाळी सात ते एक वाजेपर्यंत चालले आणि सामूहिक मेजवानी आयोजित करण्यात आली. त्यामुळे लग्नानंतर वाईट आत्मा कुत्र्यांमध्ये शिरतो, अशी समाजाची धारणा आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी ही अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.
गेल्या महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका कुटुंबात दोन कुत्र्यांचं भव्य लग्न आयोजित करण्यात आलं होतं. व्हिडिओमध्ये पाहुणे लग्नात एन्जॉय करताना दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सजावट अगदी तशीच होती, जी भारतातील सामान्य लग्नांमध्ये केली जाते. मादी कुत्र्याला लाल स्कार्फने सजवले होते. तर वर कुत्रा इलेक्ट्रिक टॉय कारमधून लग्नाला आला होता. मादी श्वानाला पारंपरिक डोलीत निरोप देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.