मुंबई 01 मे : 200 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या मुंबईतील एका अभियंत्याला 25 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने तो सर्व आरोपातून मुक्त होतो, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. 25 वर्षांनंतर अभियंत्याला मिळालेला न्याय, याबद्दल आनंद आणि खेदही आहे. खोट्या आरोपांमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याची अजून 18 वर्षांची नोकरी बाकी होती, त्याचंही नुकसान झालं.
लाचखोरीच्या आरोपामुळे कनिष्ठ अभियंता असलेल्या प्रवीण शेळके यांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागलं. मात्र, अखेर पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केलं. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सप्टेंबर 1998 मध्ये 200 रुपयांची लाच घेताना पकडलं होतं. ब्युरोने त्याला सोलापूरच्या कुर्डूवाडी परिसरात एका व्यक्तीकडून लाच घेताना अटक केली होती.
तुमच्या शहरातून (मुंबई)
या प्रकरणी 2002 साली कोर्टात सुनावणी करताना आरोपी शेळके याला दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात अभियंत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, यादरम्यान अभियंत्याला विद्युत विभागातून बडतर्फ करण्यात आलं. या खटल्याबाबत त्यांना पत्नी आणि मुलांचीही साथ मिळाली नाही, मात्र ते ठाम राहिले आणि तब्बल 25 वर्षांनंतर न्यायालयाने त्यांना या प्रकरणात निर्दोष घोषित केलं.
चेकवर रक्कम लिहिल्यानंतर Only का लिहिलं जातं? हे आहे त्यामागील कारण
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सरकारी बाजू हे सिद्ध करण्यात अपयशी ठरली आहे, की अभियंत्याने लाच मागितली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाचखोरी प्रकरणात निर्दोष सुटलेल्या शेळके यांनी आता आपलं नुकसान भरून काढण्याचं ठरवलं आहे. वकिलाशी बोलून ते लवकरच कोर्टात जाणार आहेत आणि याच दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून या खटल्यात झालेल्या नुकसानीबाबत ते आवाज उठवणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.