वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 18 मे : ‘2024 पर्यंत भाजपात मोठे नेते येतील. राज्यात ब्लास्ट झालेलं दिसतील. खूप मोठी नाव समोर येतील. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत, 30 तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या भरतीचे संकेत दिले आहे.
पुण्यात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ठाकरे गटांच्या आरोपांना उत्तरं दिली.
तुमच्या शहरातून (पुणे)
‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही 2024 मध्ये राज्यात चांगला विजय मिळवू. मोदींच्या नेतृत्वात आम्ही 2024 मध्ये देशात सरकारं आणू. राज्यभर ३५ लाख कार्यकर्ते काम करतील. भाजपा कागदावर कधीचं बोलत नाही 3 विरुद्ध एकची लढाई होती म्हणून आम्ही कसबा हरलो. पण आता युती म्हणून आम्ही तयार आहोत. राज्यात आमच सरकारं काम करत आहे. जनता भुलथापला बळी पडणार नाही. जनतेचा फडणवीस अणि शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत, 30 तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील, असे संकेतही बावनकुळेंनी दिले.
(कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, संपत्ती वाचून व्हाल थक्क)
100 टक्के सगळे आमदार त्यांच्या मतदार संघात ठाम आहेत. हे सगळं उद्धव ठाकरे यांचं फेल्युअर आहे. राज्यात आलेले सरकारं नैसर्गिक आहे. 2019 मध्ये सगळे आमदार युती म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील हे त्या सगळ्यांनी मान्य केलं होतं. हे सगळे भाजप-सेना मतदानावर निवडून आले होते. ते काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतावर हे निवडून आले नाहीत, अशी आठवणही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना करून दिली.
‘गद्दार आणि खोके यावर ठराव काय करणार आहात. ज्या नेत्याला आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत त्यांनी राजीनामा दिला म्हणून आमचं सरकारं आलं. मी अडीच वर्ष सांगत होतो की, सेनेचे अनेक आमदार नाराज आहेत. आमदरांना भीती वाटत होती म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला खोके वगैरे काही नाही, असंही बावनकुळे म्हणाले.
संजय राऊतला मुंबईत कुणी आल की त्यांची सेना किंचित होईल. त्यांचे नेते भाजपात येतील ही त्यांची भीती. जे पी नड्डा सगळीकडे फिरत आहेत. संजय राऊत यांना मिरची यासाठी लागली असेल की आम्ही म्हणालो की, मुंबई आम्ही जिंकू. बघू कोण हारतं कोण जिंकत घोडे मैदान लांब नाही. संजय राऊत यांना निवडणुकीत कळेल की जे पी नड्डा काय आणि कोण आहेत, असा टोलाही बावनकुळेंनी राऊतांना लगावला.
कुरुलकर प्रकरणावर प्रतिक्रिया
हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले कुरुलकर यांची चौकशी सुरू आहे, त्यात बोलणं योग्य नाही. राष्ट्रवादीने आपलं घर तपासून पहावे, चौकशी सुरू आहे, सत्यसमोर येईल, अशी प्रतिक्रियाही बावनुकळेंनी दिली.
समीर वानखेडे प्रकरण
‘कुठलेही पक्षाचा कोणताही व्यक्ती गुन्हा केला असेल तर त्यावर कडक करवाई झाली पाहिजे. जे कायद्याचे बाहेर जातील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही बावनकुळेंनी दिली.
बैठक बॅनर अनधिकृत आरोप
सभेसाठी लावलेल्या सगळया बॅनरचे पैसे आम्ही भरले आहेत. सगळे अधिकृतरित्या लावले आहेत. कुणीही चुकीचे आरोप करु नये राज्यातील भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चालते. अनेक निर्णय त्यांच्याच नेतृत्वात घेतले जातात, असंही बावनकुळेंनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.