फिलिपीन्स, 30 मार्च : दक्षिण फिलिपीन्समध्ये तब्बल 250 प्रवासी आणि सहकर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. जहाजाला आग लागल्यानंतर तब्बल 31 जणं बुडाले. तर काही जणं होरपळले. राज्यपालांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.
जहाजाला आग लागल्यानंतर प्रवासी घाबरले आणि अनेकांनी समुद्रात उडी घेतली. यानंतर नौसेना अन्य बोटीवरील प्रवाशी, मासेमारी करणाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढले. अद्यापही अनेक प्रवाशी बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. जळाल्यानंतर जहाजाला बसिलनच्या तटापर्यंत नेण्यात आलं. येथे सुरक्षा कर्मचारी आणि अन्य अधिकाऱ्यांसह प्रवाशांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या जहाजातून तब्बल 250 जणं प्रवास करीत होते. त्यापैकी 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 18 जणांचा शोध सुरू आहे.
At least 31 have died from a ferry that caught fire on Thursday morning off Basilan in rhe Southern Philippines, the governor said. 🎥: Philippine Coast Guard pic.twitter.com/PYhjipu5eA
— Barnaby Lo 吳宗鴻 (@barnabychuck) March 30, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.