कोल्हापूर, 6 एप्रिल : अनेकजण आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतात. अशावेळी काही जणांचे शिक्षण मागे राहुन जाते. त्यामुळे काही जण हे शिक्षण पूर्ण करतात, तर काही जण आपल्याच क्षेत्रावर लक्ष केंदित करतात. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिनेही पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
यासाठी स्मृती मानधना हिने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे. बी. कॉम प्रथम वर्षासाठी तिने प्रवेश घेतला आहे. याठिकाणी स्मृती मानधनाचे स्वागत संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्वतः उपस्थित राहून पुष्पगुच्छ देत केले.
भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिला वुमन्स प्रीमियर लीगमध्ये देखील आरसीबीकडून सर्वाधिक बोली मिळाली होती. त्यामुळे स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती.
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिनेही पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तिने बी. कॉम प्रथम वर्षासाठी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठ येथे प्रवेश घेतला आहे, अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
दरम्यान स्मृतीने तिच्या शिक्षणासाठी आमच्या विद्यापीठाची निवड केली, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्वोत्तरी प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.