पाटणा 20 मे : असं म्हणतात की आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीही करू शकते. जर मुलाच्या जीवाला धोका असेल तर आई आपलं शौर्य आणि धैर्य दाखवून कोणाशीही लढायला तयार होते. अशीच एक घटना बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात पाहायला मिळाली. जिथे व्हीटीआर (वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प) मंगुराहा वनपरिक्षेत्रातील गौनाहा ब्लॉकच्या नवका गावात एका आईने आपला जीव धोक्यात घालून वाघापासून आपल्या मुलांना वाचवलं.
प्रत्यक्षात वाघाने कमलेश उदाव यांच्या पत्नीवर हल्ला केला. सकाळी घराबाहेर पडताच वाघाच्या हल्ल्याने महिला प्रथम घाबरली. पण, त्यानंतर महिलेनं धाडस दाखवत लोकांना बोलावून आपल्या मुलांना वाघापासून वाचवलं. महिलेवर हल्ला केल्यानंतर वाघाने तिच्या घरात प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने वाघ जळाऊ लाकडे ठेवलेल्या खोलीत शिरला. महिलेची तीन मुलं शेजारच्या खोलीत झोपली होती. महिलेनं आवाज केल्यावर लोक जमा झाले आणि त्यांनी तीन मुलांना सुखरूप बाहेर काढलं.
विषारी सापाला व्यक्तीने ग्लासात पाजलं पाणी, काळजाचा ठोका चुकवणारा Video
इकडे ग्रामस्थांच्या माहितीवरून वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून लोकांना हटवून घराला चारही बाजूंनी वेढा घातला. वाघाच्या रेस्क्यूसाठी अधिकार्यांपासून ते कर्मचारी मोहिमेत गुंतले आहेत. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगुराहा वनपरिक्षेत्रातून भटकत वाघ गौनाहाच्या नवका टोला येथे पोहोचला. वाघ गावात आल्यावर कोणालाच दिसलं नाही. मात्र, सकाळी कमलेशच्या पत्नीवर हल्ला झाल्यानंतर वाघाच्या प्रवेशाची माहिती लोकांना मिळाली. माहिती मिळताच दोन किमी अंतरावर असलेल्या मंगुराहा वन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर आजूबाजूच्या घरांतील लोकांनी छतावर आसरा घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.