तिरुवनंतपुरम, 24 मे : घटस्फोट झाला, जोडीदाराचा मृत्यू झाला एकट्याने आयुष्य जगणं शक्य नाही, पदरात मुलं असतील त्यांना एकट्याने सांभाळणं होत नाही अशा परिस्थिती कित्येक लोक दुसरं लग्न करतात. असाच तीन मुलांचा बाप असलेल्या एका व्यक्तीनेही दुसरं लग्न केलं. पण त्याच्या लग्नानंतर मात्र होत्याचं नव्हतं झालं. लग्नानंतर 8 दिवसांतच संपूर्ण कुटुंब संपलं आहे. केरळमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
कन्नूरमधील हे कुटुंब. या कुटुंबातील पाच जणांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. माहितीनुसार पुरुष आणि महिला दाम्पत्य होतं, काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. शाजी आणि श्रिजा असं त्यांचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे.
लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन्…; नवरीसोबत भयंकर घडलं
या दाम्पत्याचं 16 मे रोजी लग्न झालं. पण काही दिवसांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत होता. हे दोघं नवरा-बायको होते. दोघांनी आत्महत्या केल्यासारखं प्रथमदर्शनी दिसत होतं. तर तिन्ही मुलांचे मृतदेह पायऱ्यांवर होते. त्यांची हत्या करण्यात आली.
शाजीचं आधी एक लग्न झालं होतं. पण दुसरं लग्न करण्याआधी पहिल्या पत्नी कायदेशीररित्या घटस्फोट दिला नव्हता. घटस्फोट न देताच त्याने दुसरं लग्न केलं. पहिल्या पत्नीपासून त्याला तीन मुलं होती.
बाथरूमच्या भिंतींतून बाहेर आली माणसाची बोटं अन्.., ते दृश्य पाहून हादरली तरुणी, थेट पोलीसच बोलावले
पोलीस आता या पाच जणांच्या मृत्यूचा अधिक तपास करत आहेत. घटनास्थळावरून अनेक पुरावे गोळा करण्यात आले असून, त्याआधारे तपास करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.