विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 14 एप्रिल : मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मेडिकल शॉपमध्ये आणखी 30 रुपये स्कॅन केल्यानंतर काही अज्ञात लोक दुकानदाराशी भांडताना दिसत आहेत.
दुकानदाराला स्कॅनरमध्ये 30 रुपये जास्त देण्यात आले, यानंतर दुकानदाराने हे पैसे परतली दिले, पण काही वेळाने आरोपी त्याच्या कुटुंबियांसह आला आणि त्याने दुकानदाराशी वाद घालत मारामारी सुरू केली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
भांडणाच्या व्हिडीओमध्ये आरोपी दुकानदाराला कशी बेदम मारहाण करत आहेत हे दिसत आहे. 30 रुपयांसाठी त्यांना मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
30 रुपयांवरून मेडिकल शॉपमध्ये तुफान राडा, दुकानदाराला बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज समोर, मुंबईच्या कांदिवली भागातली घटना#Mumbai pic.twitter.com/jHce1f2mbI
— News18Lokmat (@News18lokmat) April 14, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.