नवी दिल्ली 18 मे : दिल्लीतील पॉश राजौरी गार्डन परिसरातून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे फ्लॅटमध्ये एका 35 वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पूजा असं मृत महिलेचं नाव आहे.
मृत महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांना समजलं की, मयत महिलेचं सहा महिन्यांपूर्वी एसके गुप्ता नावाच्या 71 वर्षीय व्यक्तीशी लग्न झालं होतं. ते व्यावसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांना 45 वर्षांचा अपंग मुलगा आहे.
वृद्ध महिलेच्या हत्याकांडाचा पर्दापाश, घटनाक्रम वाचून तुम्हालाही बसेल धक्का
आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांनी या वयात दुसरं लग्न केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, लग्नानंतर लगेचच वृद्ध आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद सुरू झाले. दोघांमध्ये भांडण होऊ लागले. घटस्फोटाच्या बदल्यात महिला एक कोटी रुपयांची मागणी करत होती. एसके गुप्ता इतके पैसे द्यायला तयार नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, एसके गुप्ता यांच्या अपंग मुलाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या विपिन सेठी यांच्याकडे वृद्धाने आपली समस्या मांडली. विपिनने 10 लाख रुपयांमध्ये महिलेला रस्त्यातून हटवून देऊ, असं सांगितलं.. त्यापैकी दोन लाख 40 हजार रुपये विपिनला अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले. संधी मिळताच विपिन आणि त्याचा साथीदार हिमांशू यांनी पूजाचा चाकूने वार करून खून केला. ही घटना दरोड्यासाठी घडवल्याचं भासवण्यासाठी घराची तोडफोड करण्यात आली आणि मुलगा अमितचा फोनही हिसकावून घेतला.
पोलिसांनी घटनास्थळाजवळ लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले. प्राथमिक तपासातच पोलिसांना या घटनेमागे लुटीचा हेतू सापडला नाही. अशा स्थितीत पोलिसांनी एस.के.गुप्ता यांची कडक चौकशी केली, त्यानंतर संपूर्ण रहस्य उघड झालं. आरोपी एसके गुप्ता, विपिन सेठी आणि अमित यांनी गुन्ह्यात आपली भूमिका कबूल केली. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्येमध्ये वापरलेला फोन, रक्ताने माखलेले कपडे आणि घटनेत वापरलेली स्कूटी जप्त केली आहे. गुन्हा करताना विपिन सेठी आणि हिमांशू उर्फ बल्ली हे दोघे जखमी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.