मुंबई, 9 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला सुरुवात झाली असून या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तब्बल 4 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरणारी धोनीची चेन्नई सुपरकिंग्स यंदा चांगल्या फॉर्मात असून त्यांनी 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव केला. दरम्यान आयपीएलच्या निमित्ताने विमान प्रवास करत असताना एका पायलटने धोनीला कळकळीची विनंती केली याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलच्या 16 सीजननंतर निवृत्ती घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप धोनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी त्याच्या निवृत्तीबाबत यंदा क्रिकेट विश्वात चर्चा आहे. परंतु अशातच धोनीवर प्रेम करणारे चाहते त्याला निवृत्ती न घेण्याची विनंती करीत असताना आता विमानातील पायलटने ही एम एस धोनीला अशीच विनंती केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या हायव्होल्टेज सामन्यासाठी धोनी सह संपूर्ण चेन्नईचा संघ विमानातून मुंबईला येत होता. या दरम्यान चेन्नईच्या टीमला आपल्या सोबत प्रवास करताना पाहून विमानातील इतर प्रवाशांनाही सुखद धक्का बसला. यानंतर विमान तब्बल 36 हजार फुटांवर असताना विमानातील पायलटने संपूर्ण चेन्नई संघाचे स्वागत केले. संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक करत असताना त्याने एम एस धोनीला चेन्नईची कॅप्टनशीप कधीही न सोडण्याची विनंति केली. त्याच्या या विनंतीने विमानातील इतर प्रवासी देखील काहीसे भावुक झाले.
Was on the same flight with thala and csk team and the pilot was a big fan of csk #mycaptain #CSK #yellove #dhoni #thala pic.twitter.com/MV5UPnYOFf
— one has no name 💙 (@namenotfound92) April 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.