मुंबई, 27 मार्च : दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात धावांचा पाऊस पडला. दोन्ही संघांनी मिळून ५१७ धावा आणि २ शतके या सामन्यात झाली. दक्षिण आफ्रिकेने टी२० च्या इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्येचं आव्हान ७ चेंडू राखून सहज पूर्ण केलं. यात वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने वेगवान शतक झळकावत इतिहास घडवला. तो वेस्ट इंडिजकडून सर्वात वेगवान टी२० शतक करणारा फलंदाज ठरलाय. या बाबतीत त्याने दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकलं.
चार्ल्सने ४० मिनिटांच्या खेळीत ३९ चेंडूत शतक झळकावलं. सेंच्युरियन मैदानावर झालेल्या सामन्यात चार्ल्स दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने काइल मेयर्ससोबत दुसऱ्या गड्यासाठी १३५ धावांची भागिदारी केली. चार्ल्सने ३९ चेंडूत शतक पूर्ण केलं. तर ४६ चेंडूत ११८ धावा केल्या. गेलच्या वेगवान शतकाचा विक्रम त्याने मागे टाकला. गेलने ४७ चेंडूत शतक झळकावलं होतं.
शफालीच्या विकेटवरून वाद! नो बॉल होता की नव्हता? दिल्ली कॅपिटल्सने उपस्थित केला प्रश्न
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणाऱ्या क्रिकेटर्समध्ये जॉनसन चार्ल्स चौथ्या क्रमांकावर आहे. डेव्हिड मिलर, रोहित शर्मा, एस विक्रमसेकरा यांच्यानंतर चार्ल्सचा नंबर लागतो. वेस्ट इंडिजकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या गेलच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. पहिल्या क्रमांकावर याबाबतीत एविन लुइस आहे. त्याने १२ षटकार मारले होते.टी २० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ३५ चेंडूत तीन खेळाडूंनी केलंय. त्यात डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि एस विक्रमसेकरा हे तिघे आहेत. त्यानंतर चार्ल्स जॉन्सनचा नंबर लागतो.
जॉन्सन चार्ल्स हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना खेलळा होता. दहा वर्षांपेक्षा जास्त मोठी कारकिर्द असली तरी त्याला आतापर्यंत फक्त ४० टी२० सामनेच खेळायला मिळाले आहेत. यात त्याने १३० च्या स्ट्राइक रेटने ९५० धावा केल्या आहेत. यात १०० पेक्षा जास्त चौकार आणि ४० हून अधिक षटकार मारले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.