भरतपूर, 18 मे : चोर कधी काय चोरी करेल याचा नेम नाही. घरात चोरीचे प्रकार नवीन नाही. पण, मंदिर आणि देवीची मूर्ती चोरी करण्याचे प्रकार काही केल्या कमी नाही. राजस्थानमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये चोरांकडून तब्बल 5 कोटी रुपयांच्या मूर्तींची जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात एका जणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतपूर जिल्ह्यातील हलैना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि मूर्ती तस्करांना अटक केली. जयपूर येथून 2 वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या सुमारे 5 कोटी रुपयांच्या 2 मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. विजेंद्र सिंह असं या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी या मूर्ती तस्कराला अटक करण्यासाठी सापळा रचला. यावेळी एका हवालदार ग्राहक बनून चोराला भेटायला गेला होता.
आरोपीने भगवान महावीराची मूर्ती महागड्या किंमतीत विकण्याचा प्रयत्नात होता. पण मूर्तींचा सौदा सुरू झाला आणि पोलिसांनी आरोपीला रंगेहात अटक केली. पोलिसांनी जेव्हा त्याला खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने मूर्ती चोरली असल्याचं कबूल केलं. त्याने ज्या ठिकाणी मूर्ती लपवून ठेवल्या होत्या पोलिसांनी दोन्ही मूर्ती जप्त केल्या आहेत. या मूर्तींची बाजारातील किंमत सुमारे 5 कोटी रुपये इतकी होती.
आरोपी विजेंद्रने 2021 मध्ये जयपूरच्या महावीर नगर येथील भगवान महावीर जैन मंदिरातील मूर्ती चोरी केली होती. ही मूर्ती महागड्या दराने विकण्याचा त्याचा प्लॅन होता. पण वेळीच पोलिसांनी तो उधळून लावला. या प्रकरणात त्याच्यासोबत इतर कोण-कोण साथीदार सहभागी होते आणि त्याने ही मूर्ती कशी चोरी केली, याबाबत पोलीस विजेंद्रची चौकशी करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.