मुंबई, 1 मे : मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ’50 खोका तुमने खाया, महाराष्ट्राने क्या पाया’ या रॅपच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली. यावेळी कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आव्हाड यांनी टीका केली. तर काही दिवसांपूर्वी रॅपर मुलांना अटक केल्याचाही मुद्दा उपस्थित केला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
तुमच्या शहरातून (मुंबई)
सोबत आले नाही तर जेलमध्ये टाकू अशी धमकी खोके सरकारकडून दिली जाते. बारसू प्रकरणात आम्ही लोकांसोबत आहे. कोकणात रिफायनरी उभारण्यासाठी सरकार का इतका जोर लावत आहे, अशी शंका आव्हाड यांनी उपस्थित केली. आमचा विकासाला विरोध नाही. पण त्यामुळे जर पर्यावरणाची हानी होत असेल, अशा प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत उभे राहणार असल्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली. बारसू प्रकल्पात सरकारकडून अन्याय झाल्याचेही ते म्हणाले. या आंदोलनात महिलांनाही अटक करण्यात आली आहे. ज्यात काही महिलांना लहान मुलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
वाचा – …आणि अजितदादा स्टेजवर आले, समोर संजय राऊत उभे, नेमकं काय घडलं? Video
आव्हाडांचा रॅपमधून निशाणा
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील दोन तरुणांना रॅप केल्यावरुन अटक करण्यात आली होती. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला चांगलंच सुनावलं. फक्त रॅप केला म्हणून तरुणांना आत टाकलं जात आहे. यावेळी आव्हाड यांनी देखील एक रॅप सादर केला.
50 खोका तुमने खाया, महाराष्ट्राने क्या पाया?
लडकेने उसको गलमे पाया, तो पोलीसने उसको जेल दिखाया
अरे 50 खोका बोलतेही तुम क्यों चिढते हो, अपनाही रिश्ता 50 खोकेसे क्यों जोडते हो?
हे 50 खोक्या मराठी माणसाला टोचण्या देत आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नव्हती, असं मराठी माणसांचं म्हणणं असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या सरकारकडून दजपशाही सुरू आहे. विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात असल्याची टीका आव्हाड यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.