जयपूर 04 मे : कोणाचं नशीब कधी आणि कसं पलटेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अनेकदा लोक रातोरात करोडपती होतात तर अनेकदा रातोरात रस्त्यावरही येतात. अशीच एक घटना आता राजस्थानच्या प्रतापगढमधून समोर आली आहे, ज्यात एक तरुण रातोरात करोडपती झाला. त्याने ड्रीम 11 वर आपली IPL टीम बनवून 1 करोड रूपये जिंकले आहेत. युवकाचं म्हणणं आहे, की त्याच्या कुटुंबात सध्या अतिशय आनंदाचं वातावरण आहे.
धारियावाड उपविभागातील मुंगणा येथील रहिवासी असलेल्या शिवराज सिंह सिसोदिया यांनी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता 50 रुपये गुंतवून ड्रीम 11 वर आयपीएल संघ तयार केला आणि 1 कोटी रुपये जिंकले. शिवराज सिंह सिसोदिया यांचं कुटुंब अत्यंत गरीब असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तीन बहिणींपैकी दोन बहिणींचं लग्न झालं असून एकीच अजून होणार आहे.
शिवराज सिंह याचं अजून लग्न झालेलं नाही, तो गावात एक छोटेसं किराणा दुकान चालवतो. शिवराजचे वडील गरीब शेतकरी आहेत पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते बऱ्याच दिवसांपासून अंथरुणाला खिळले आहेत. शिवराजने सांगितलं की, तो कधी करोडपती होईल याची त्याला खात्री नव्हती. अचानक रात्री 11 वाजता मोबाईलवर मेसेज आला आणि काकांना दाखवला. पण त्यांनाही यावर विश्वास बसला नाही. मात्र, जेव्हा त्याने तो मेसेज अनेकदा वाचला तेव्हा त्याला खात्री पटली की तो करोडपती झाला आहे.
…तर वडिलांच्या संपत्तीत मुलींना वाटा नाही, काय सांगतो कायदा?
या पैशातून चांगलं दुकान उभारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार असल्याचं शिवराज सांगतो. शिवराजचं अभिनंदन करण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. शिवराजकडे B.ED ची पदवी आहे, नोकरी करण्याचीही इच्छा आहे. सध्या तो किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. शिवराजचे काका पप्पू यादव यांनी सांगितलं की, शिवराजने इतके पैसे जिंकले याचा मला खूप आनंद आहे. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. हे कुटुंब बऱ्याच दिवसांपासून संघर्ष करत आहे, आता त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.