मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रानं असं राजकारण याआधी कधीही पाहिलं नाही. २०१४मध्येच तुमची सत्ता आली. पण ७ वर्षांनंतर तुम्ही सगळं कळतंय, हे किळसवाणं राजकारण आहे. आज ५५ लाखांच्या व्यवहारासाठी तुम्हाला ईडी लागत असेल, तर यापुढे १० रुपयेही खिशात ठेवताना विचार करावा लागेल, की याचीही ईडी चौकशी होऊ शकते, अशा शब्दांत मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.