मुंबई, 21 एप्रिल- कोणतंही काम करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा ठरलेली असते, मग तो अभ्यास असो किंवा सरकारी नोकरी. सर्वांसाठी वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. याच नियमानुसार उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) पदासाठीदेखील वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. पण, कॅटेगरीनुसार काही उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाबद्दल (यूपीपीएससी) बोलायचं झालं तर, साधारणपणे एसडीएम होण्याची वयोमर्यादा 21 वर्षे ते 40 वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. मात्र, कॅटेगरीनुसार कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. यूपीमध्ये, दिव्यांग उमेदवार 55 वर्षांच्या वयापर्यंत एसडीएम होऊ शकतात. याशिवाय इतरही काही उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाते.
मोठी बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर ‘या’ तारखांना सुरु होणार शाळा
यूपीपीएससी पीसीएससाठी पात्रता निकष
आयोगानं नमूद केलं आहे की, सर्व आपत्कालीन आयोग किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी ज्यांना लष्करानं कार्यमुक्त केलेलं नाही मात्र, त्यांच्या पुनर्वसनाची स्थिती वाढवण्यासाठी त्यांनी खालील पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजेत:
– उमेदवारावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही किंवा तशी कारवाई सुरू नाही असं सांगणारं लष्कर, हवाईदल किंवा नौदल यातल्या जबाबदार अधिकाऱ्याच्या सहीचं सर्टिफिकेट या उमेदवारानं सादर करणं गरजेचं आहे.
– पीसीएस सेवेत भरती होताना सैन्याची सेवा सोडल्याचं लेखी हमीपत्र असावं.
– आरक्षण किंवा वयोमर्यादा सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी उमेदवारांकडे पुरावा असणं गरजेचं आहे.
– उत्तर प्रदेशचा रहिवासी दाखला पाहिजे.
– जबाबदार पदावरील अधिकाऱ्याकडून कॅटेगरी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे.
– महिला उमेदवारांकडे वडिलांचं जात किंवा रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक.
– एकापेक्षा जास्त जिवंत पत्नी असलेले पुरुष उमेदवार पात्र नाहीत. (जोपर्यंत राज्याचे राज्यपाल सूट देत नाहीत तोपर्यंत.)
– ज्या महिला उमेदवारांनी आधीची पत्नी जिवंत असलेल्या व्यक्तीशी विवाह केला आहे त्या पात्र नाहीत. (जोपर्यंत राज्याचे राज्यपाल सूट देत नाहीत तोपर्यंत.)
– ज्या महिला उमेदवार गरोदर आहेत (12 आठवडे किंवा त्याहून अधिक) त्यांना तात्पुरतं अयोग्य घोषित केलं जाईल.
– यूपीपीएससी परीक्षेसाठी एकापेक्षा जास्त श्रेणींमध्ये वय सवलत किंवा आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना फक्त एकदाच सूट मिळेल.
यूपीपीएससी वयोमर्यादा
यूपीपीएससी पीसीएस संयुक्त राज्य/उच्च अधीनस्थ सेवा परीक्षेसाठी किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे आहे. याशिवाय, यूपीपीएससी पीसीएस अधिसूचनेनुसार, विविध श्रेणी/पदांसाठी वयात खालीलप्रमाणे सवलत दिली आहे.
– एससी, एसटी, ओबीसी, यूपी वर्गीकृत खेळांतील कुशल खेळाडू, यूपी राज्य सरकारचे कर्मचारी (मूलभूत शिक्षण परिषद आणि सरकारी अनुदानित माध्यमिक शाळांचे शिक्षक/कर्मचार्यांसह), इमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसर/ शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर/ बी लेव्हलच्या पदावर काम करणाऱ्या माजी सैनिकांना वयामध्ये पाच वर्षांची सवलत देण्यात येते.
– शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या (PwD) उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये 15 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.