मुंबई, 1 मे : महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी बारसू, बुलेट ट्रेन तसंच आरे मेट्रो कारशेडवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. आता महाराष्ट्रात बारसूचा विषय भडकला आहे, येत्या 6 तारखेला मी बारसूला जाऊन लोकांना भेटणार आहे आणि बोलणार आहे. कसं काय तुम्ही मला आडवू शकता?. काय आहे बारसूमध्ये, तो काय पाकव्याप्त काश्मिर नाही. तो माझ्या महाराष्ट्राचा भाग आहे. 6 तारखेला बारसूला जाणार आहे आणि त्यानंतर सभा घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी पवार यांच्या अंमलाखाली गेलो, असं ही लोक सांगत होती. आज उदय सामंत हे शरद पवार यांना भेटून आले. काय करू, काय करू असं विचारात आहात. बारसूचं पत्र दाखवून बारसू बारसू करत असाल आणि स्वत: बारसं करून घेताय. तुम्ही कराल ते योग्य आणि आम्ही जाऊन भेटून आलो तर लगेच चुकीचं, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
अजितदादा इज बॅक, बाळासाहेबांचं स्मरण करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा!
आपलं सरकार गेलं आणि त्यांनी बीकेसीची सोन्यासारखी जागा ही बुलेट ट्रेनच्या घशात घातली. आज किती लोक अहमदबादला जाणार आहेत. कुणासाठी हे करात आहात? आपलं सरकार आल्यानंतर मेट्रो कारशेडची जागा थांबवली होती. माझा हेतू स्वच्छ होता, पर्यावरणाचा ऱ्हास न होता कांजूरमार्गची आणखी मोठी जागा मिळत असेल तर अंबरनाथपर्यंत विस्तार करणार होतो. पण ही लोक कोर्टात केली. केंद्र सरकार सुद्धा कोर्टात गेलं. जागा अडून ठेवलं. आता कांजूरमार्गमध्येही कारशेड उभारणार आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
…आणि अजितदादा स्टेजवर आले, समोर संजय राऊत उभे, नेमकं काय घडलं? Video
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.