मुंबई, 30 मे- 2017 साली बॉलिवूडचा हँडसम हंक स्टार हृतिक रोशनचा आलेला ‘काबिल’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या सिनेमात हृतिक रोशन आणि यामी गौतम यांचा अभिनयही लोकांना आवडला होता. या चित्रपटापूर्वी हृतिकचे ‘बँग बँग’ आणि ‘मोहेंजोदारो’ हे दोन सिनेमे मोठे फ्लॉप ठरले होते, त्यामुळे हृतिकने पुन्हा एकदा ‘काबिल’च्या माध्यमातून अभिनेता म्हणून सिद्ध केलं. या सिनेमानं 200 कोटीती कमाई केली होती.
हृतिक रोशन जेव्हा आपल्या वडिलांसोबत एखादा चित्रपट घेऊन येतो, तेव्हा त्याने नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याच्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी अभिनेत्याला इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनवले आहे. पण 2017 साली आलेला त्याचा ‘काबिल’ हा चित्रपट असा आहे ज्याच्या माध्यमातून हृतिकने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो अजूनही लोकांचा आवडता स्टार आहे.कारण याआधी ‘बँग बँग’ आणि ‘मोहेंजोदारो’ या त्याच्या बिग फ्लॉप सिनेमांमुळे चाहत्यांची मने काहीशी नाराज झाली होती. यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या होम प्रॉडक्शनच्या ‘काबिल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरला. हृतिकने त्याच्या वडिलांसोबत राकेश नेहमीच हिट सिनेमे दिले आहेत.
चित्रपट अवघ्या 77 दिवसांत पूर्ण
हृतिकचा 2017 मध्ये आलेला ‘काबिल’ हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या अभिनयानेही लोकांना आश्चर्यचकित केले. सस्पेन्स, थ्रिलर आणि रोमँटिक अँगल असलेल्या या चित्रपटातील संवादही लोकांना आवडले होते. या सुंदर कथेचा चित्रपट अवघ्या 77 दिवसांत पूर्ण झाला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने तिकीट खिडकीवर जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
करिअरमधील सर्वात हिट सिनेमा
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हृतिकने आपल्या अभिनय प्रतिभेने लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे हृतिकच्या करिअरला नवी दिशा मिळाली. हा चित्रपट हृतिकच्या कारकिर्दीतील एक मोठा हिट चित्रपट ठरला. ‘काबिल’ची स्टारकास्ट, संगीत आणि चित्रीकरण इतकं भन्नाट होतं की प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसवर खेचण्यात ते यशस्वी झाले. या चित्रपटानंतरही हृतिकने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटाच्या कमाईने निर्मातेही मालामाल झाले.
डिस्ने+ हॉटस्टारवरील या रिव्हेंज सिनेमात हृतिक रोशन ‘ब्लाइंड मॅन’ बनून त्याने शत्रूंना सळोकी-पळो करून सोडलं. दोन फ्लॉप चित्रपटांनंतर हृतिकने पुन्हा एकदा सिद्ध केले की, आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांची मने कशी जिंकायची हे त्याला माहित आहे.
.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.