नाशिक, 1 मे : सरकारकडून वेळोवेळी उपाययोजना करुनही रस्ते अपघात कमी होताना दिसत नाही. दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीत रस्त्यालगत सोमवार सायंकाळी सहा वाजता झाला इंट्रा (चारचाकी) चाकाखाली येऊन आठ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या डोक्याहून गाडी गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
जोया सलीम शेख (वय ८ ) अपघातात मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. शेख दांपत्यास हे एकुलती एक अपत्य असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताच्या घटनेने उपस्थित संतप्त जमावाने गाडीची तोडफोड करीत ड्रायव्हरला मारहाण केली असल्याचे वृत्त समोर येत आहे.
वाचा – धक्कादायक! वाहनात हवा भरली नाही म्हणून पंक्चर दुकानदारालाच संपवलं
तुमच्या शहरातून (नाशिक)
काय आहे घटना?
जोया सलीम शेख (वय 8 ) असे अपघातात मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने पिकअपची तोडफोड करत ड्रायव्हरला मारहाण केली. जोयाचे वडील सलीम शेख यांनी ॲम्बुलन्सचा रस्ता अडवल्याने अवधूत वाडी रस्ता अचानक जाम झाला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पथकासह रवाना घटनास्थळी दाखल झाले. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अति शीघ्र दल पथकाला पाचारण केले होते.
वाचा – यवतमाळ : मुलाचे वर्तन सुधरत नव्हते, जन्मदात्याने आईने मुलाची दिली सुपारी अन्…
यामुळेच गर्दीची परिस्थिती नियंत्रणात आली. पंचवटी पोलीस ठाण्यात मयत जोयाचे नातेवाईक यांनी फिर्याद दाखल करीत आहेत. सदर इंट्रा चारचाकी वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास पाचशे ते सहाशे जणांचा जमला जमाव होता. मायको दवाखाना ते अवधूतवाडी यादरम्यान मोठी गर्दी झाली होती. सलीम शेख (वय 30) हे अवधूतवाडी येथील सुलभ शौचालय सांभाळण्याचे काम करीत होते. तर डाळिंब मार्केटलाही पॅकिंगचे काम करत. नवरा बायको व मुलगी असा त्यांचं चौकोनी कुटुंब होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.