बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कॉलेज जीवनात आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. खऱ्या अर्थानं कोणत्याही पदाची अपेक्षा मनात नव्हती. तेव्हा बाळासाहेबांचे विचारच मनात होते. राष्ट्रहित, अन्यायाच्या विरोधात लढणं त्यांचे विचार ऐकून आम्ही शिवसेनेत आलो, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली.
मंत्री झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांनी दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.