मुंबई, 2 एप्रिल : जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. आज आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार असून याकरता क्रीडा प्रेमी उत्सुक आहेत. यासामन्यात प्लेईंग 11 निवडताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने असं काही करून दाखवल जे आयपीएलच्या उर्वरित 9 संघांपैकी कोणालाही जमलं नाही.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामन्याला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दोन संघांमध्ये टॉस झाला असून हा टॉस आरसीबीच्या कर्णधाराने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. परंतु आयपीएलचा पहिला सामना खेळताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने धाडसी निर्णय घेतला जो इतर 9 संघांना घेता आला नाही.
टॉस झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपला प्लेईंग 11 संघ जाहीर केला. यात रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान यांचा समावेश आहे. परंतु या प्लेयिंग 11 मध्ये रोहित शर्माने केवळ 3 परदेशी खेळाडूंचा समावेश केला आहे. तर बेहरन डॉर्फ याला प्लेअर इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत स्थान दिले आहे. आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये झालेल्या 4 सामन्यात सर्व संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात 4 परदेशी खेळाडू खेळवले होते. परंतु रोहितने मात्र मुंबईच्या पहिल्या सामन्यासाठी नवीन रणनीती आखल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.